सरकारने जनतेची दिशाभूल करण्याऐवजी दुध उत्पादक शेतकऱ्यांना दहा रुपये अनुदान द्यावे - आ. विखे पाटील. ◻माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटलानी घेतली इंदोरीकर महाराजीची भेट.


संगमनेर | संजय गायकवाड

 

केंद्र सरकार वर टिका करुन जनतेची दिशाभूल करण्यात त्यांना यश मिळेल, या भ्रमात राज्य सरकार असून जनता त्यांच्या थापांना भुलनार नाही. जनतेची दिशाभूल करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती वर भर देऊन दुध उत्पादक शेतकऱ्याना सरकारने दहा रुपये अनुदान त्वरित द्यावे. अशी मागणी माजी मंत्री भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.     

 

माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संगमनेर तालुक्यातील ओझर येथिल इंदोरीकर महाराज यांच्ता निवासस्थानी भेट दिल्यानंतर पत्रकाराशी ते बोलत होते. दरम्यान मनसे नेते अभिजित पाणसे, विश्वहिंदु परीषदेचे क्षत्रिय मंत्री शंकर गायकर याच्या पाठोपाठ माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी इंदोरीकर महाराजाना पाठिंबा जाहीर केला आहे.     

 

यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. विखे पाटील म्हणाले की, इंदोरीकर महाराजावर सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रिये संदर्भात बोलणे उचित ठरणार नाही. कायद्याच काम कायद्याला करु द्या. मात्र इंदोरीकर महाराज यांनी महाराष्ट्रात समाज प्रबोधनाबरोबर जन जागृतीचे मोठे काम केले आहे. संतांच्या विचारातुन समाज जागृतीचे काम होत आहे. हे आपण मान्य केल पाहिजे. त्यांना लोकमान्यता आहे. त्यांना समाजाचे व माझे पाठबळ असन या बाबत मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

याबाबत सरकारने संवेदनशील असायला पाहिजे होते. मात्र सरकार म्हणून त्यांच्या संवेदना दिसल्या नसल्याचा टोला त्यांनी सरकारला लगावला.

 

संवेदना हारवलेल्या सरकार कडून काय अपेक्षा धरणार असे म्हणत सरकारचे राज्यात शेतकऱ्याच्या प्रश्ना कडे लक्ष नाही. राज्यात बियाणांचा काळाबाजार सुरू असून दुबार पेरणी, खतांची टंचाई, मोठ्या प्रमाणावरील खताचे लिंकेज, दुधाचे पडलेले भाव या कडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. मागील सरकारच्या काळात  विरोधी पक्षात असताना दुध उत्पादक प्रश्नावर अंदोलन करणारे आज सत्तेत   असतांना सगळ विसरले आहेत. युती  सरकारने त्या वेळी दुधाला पाच रुपये लिटर या दराने सुमारे ६५० कोटी रुपये अनुदान दिले. आज मात्र विरोधात असताना दुध भावाच्या प्रश्नावर अंदोलन करणारी सत्तेत असताना त्यांना दुध उत्पादक शेतकऱ्याचा चा विसर पडला आहे.  दुधाची दरवाढ होऊ नये अशी मंत्र्याची भुमिका असल्याचा आरोप विखे पाटील यानी केला. तर सरकार मध्ये ऐक मेका बद्दल विश्वास नसून सरकारचे रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात असल्याने मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही असा दावा विखे पाटील यानी केली. 

 

कोविड च्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. चांगल्या कामांबाबत नंबर आला असता तर अभिमानाची गोष्ट होती, मात्र अपयशी सरकार अपयश झाकण्यासाठी लाॅक डाऊन उठवण्याची भाषा करत आहेत. केंद्र सरकार वर टिका करुन जनतेची दिशाभूल करण्यात त्यांना यश मिळेल या भ्रमात हे सरकार असून जनता त्यांच्या थापांना जनता भुलनार नाही. जनतेची दिशाभूल करण्याऐवजी प्रत्यक्ष कृती वर भर देउन दुध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर दहा रुपयांचे अनुदान त्वरित द्यावे अशी मागणी विखे पाटील यानी केली. आज दुकानात च खते नाहीत तर बांदावर खते कधी मिळणार फसव्या घोषणा करण्यापेक्षा जनतेने विश्वास ठेवला पाहिजे अश्या घोषणा सरकारने केल्या पाहिजेत. अशी घनाघाती टिका आ. विखे पाटील यानी सरकारवर केली आहे.