जामखेड - बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्ताऐवज तयार करुन महाविद्यालयासाठी परवानगी घेतली. शासनासह मूळ जागा मालकाची फसवणूक करणार्या जामखेड तालुक्यातील खर्ड्यातील श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ संचलित एक श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय, संत गजानन महाराज महाविद्यालया, प्रगती कला महाविद्यालय या तीनही शिक्षण संस्थेच्या मान्यता व सलग्नता रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी खर्डा येथील मूळ जागा मालक, ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ पत्रकार श्रीराम बागडे व त्यांचे चिरंजीव गौरव बागडे यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
खर्डा येथील बागडे पिता-पुत्रांनी राज्यपाल ना.भगतसिंहजी कोशियारी यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, खर्डा येथील श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.महेश निवृत्ती गोलेकर व त्यांचा मुलगा रणजित महेश गोलेकर व इतर नातेवाईक आणि संचालक मंडळाने संगनमताने महसूली कागदपत्रांत हेराफेरी तयार करुन बनावट दस्ताऐवज तयार केली आणि आमची स्व:मालकीची जमिन वरील संस्थेच्या नावावर लावून घेतली होती.
या संदर्भात आम्ही कोर्टात दावा दाखल केला होता. त्याचा निकाल आमच्या बाजूने लागला आहे. या निकालानुसार जामखेड कोर्टाने 3 डिसेंबर 2016 रोजी जामखेडच्या भुमी अभिलेख कार्यालयाला सदर प्रकरणात जागेची मोजणी करण्याचे आदेश दिले होते. भूमी अभिलेख कार्यालयाने 7 ऑक्टोबर 2017 रोजी पोलिस बंदोबस्तात कोर्ट कमिशनरच्या उपस्थितीत मोजणी केली. त्यामध्ये वरील शिक्षण संस्थेची तीनही महाविद्यालय व ही संस्था आमच्या जागेत असल्याचे सिद्ध झाले. जामखेड कोर्टाच्या निकाला विरोधात छत्रपती शिक्षण संस्थेने अहमदनगर कोर्टात अपिल दाखल केले होते, परंतु नगर कोर्टात गोलेकर कुटूंबियांना व छत्रपती शिक्षण संस्थेच्या संचालकांना बागडे यांच्या विरुद्ध पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे कोर्टाने 27 सप्टेंबर 2018 रोजी गोळेकर यांची व संस्थेची याचिका पुरावे सादर करु न शकल्याने निकाली काढली आहे.
आमच्या स्व:मालकीच्या जागेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे ही जागा बळाकावून तेथे शिक्षण संस्था चालविणार्या गोलेकर कंपू व त्यांच्या बगल बच्चांच्या बनावटगिरीचे भांडाफोड झाले. संस्था बेकादेशिरपद्धतीने चालू आहे. या बनावट पायावर उभ्या राहिलेल्या आणि छत्रपतींच्या नावाने सुरु असलेल्या संस्थेचा सर्व बेकादेशीर कारभार थांबवावा, अशी मागणी बागडे पिता-पुत्रांनी केली आहे. त्याचे पुरावे निवेदनासोबत जोडून या संस्थेने बनावट कागदपत्रे व जागा दाखवून शासनाची व पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आर्थिक घोर फसवणुक केली आहे. या लाखो रुपयांच्या घोटाळ्याबद्दल शासनाची सर्व संबंधित खाते आणि पुणे विद्यापीठ फसवणुक होऊन गप्प का आहेत? असा सवाल नगर जिल्ह्यातील सर्व संस्था चालकांना पडला आहे. खोट्या कागदपत्रांनी लाखो रुपयांचे भाडे व लाखो रुपयांचे अनुदान लाटणार्या या 420 लोकांनी दोनदा दोन मोठ्या संस्थांची फसवणुक केली आहे, तेव्हा त्यांच्यावर राज्यपाल महोदयांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सर्व संबंधित खात्यांना छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ व गोलेकर आणि कंपू यांच्या विरुद्ध पोलिस कारवाई जिल्हाधिकार्यांकडून महसूली कारवाई करण्याचे आदेश राज्यपाल साहेबांनी राज्याच्या मुख्य सचिवांना व पोलिस महासंचालकांना द्यावे, असे पत्रकार बागडे व खर्ड्यातील नागरिकांची मागणी आहे. या निवेदनात मूळ जागा मालक बागडे पिता-पुत्रांनी त्यांची जागा वापरल्याबाबत जागेचे रितसर भाडे बागडे यांना मिळावे, अशीही मागणी केली आहे. राज्यपालांना पाठविलेल्या या निवेदनाच्या प्रती राज्यचे मुख्य सचिव, शिक्षण सचिव, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व नव्याने आलेले वरिष्ठ पोलिस अधिक्षक अखिलेस सिंग आ.रोहितदादा पवार, संचालक उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे, पुणे विद्यापीठ, तहसिलदार यांना इमेलने, पोस्टाने व पीडीएफ फाईलने पाठविले आहे.