संगमनेर | संजय गायकवाड
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात चार ते पाच दिवसांन पुर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे बाजरी, भुईमूग, वटाणा आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश ना. थोरात यांनी महसूल व कृषी विभागाच्या आधिकाऱ्याना दिले आहेत.
तालुक्यातील पठारभागातील घारगाव, खंदरमाळवाडी, अकलापूर, शेळकेवाडी, आभळवाडी, बोटा, कुरकुटवाडी आदि गावांमध्ये चार ते पाच दिवसांन पुर्वी मध्यरात्री झालेल्या वादळी वार्यासह मुसळधार पावसामुळे बाजरी, भुईमूग, वटाणा, डाळींब या पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. तर मुसळधार पावसामुळे शेतीचे बांधही फुटून शेतांन मध्ये पाणीच पाणी साचलेले आहे. त्यामुळे सर्व सामान्य शेतकऱ्याना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने याबाबत बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या व्याथा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना सांगितल्या. त्यामुळे त्यांनीही महसूल व कृषी विभागाच्या आधिकाऱ्याना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रविवारी दुपारी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, संगमनेर पंचायत समितीच्या सभापती सुनंदाताई जोर्वेकर यांच्या सह अधिकाऱ्यानी शेळकेवाडी, अकलापूर, आभळवाडी परिसरात शेतकऱ्याच्या शेतात जावून पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
यावेळी जिल्हापरिषद सदस्य अजय फटांगरे म्हणाले की, मुसळधार पावसामुळे या पिकांच्या नुकसानी झाल्या आहेत. त्या सर्व पिकांचे पंचनामे करा. आधीच शेतीमालाला बाजारभाव नाही त्यात कोरोनाचे संकट त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी सगळीकडून संकटात सापडले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही महसूल व कृषी विभागाच्या आधिकाऱ्याना पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी रमेश आहेर, सुहास वाळुंज, अकलापूर गावचे उपसरपंच संदीप आभाळे, माजी सरपंच आरूण वाघ,सामाजिक कार्यकर्ते संपतराव आभाळे, प्रगतशील शेतकरी देवीदास शेळके, संदीप नाईकवाडी, आकील शेख, दासा गोंधे, बाळासाहेब गारे, दत्तात्रय शेळके, विजय डोंगरे, जालींदर शेळके आदि शेतकरी उपस्थितीत होते.