आवंदा सरपंच होण्याचे अनेकांचे स्वप्न कोरोनामुळे भंग.....! शेवगाव तालुक्यातील ४८ ग्रा.पं.च्या निवडणुका लांबण्याची शक्यता ?

शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख )


जुलै ते डिसेंबर २० अखेरपर्यंत शेवगाव तालुक्यातील जवळपास ४८ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मुदत संपत असुन या ठिकाणी नव्याने पदाधिकारी  निवडीकामी निवडणुका घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु केला असल्याने मुदत संपणाऱ्या ४८ ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबणीवर पडतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मागील काही वर्षामध्ये शासनाने ग्रामपंचयतींना निधी खर्चाचे अतिरिक्त अधिकार दिले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये चुरस बघायला मिळत आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  जुलै ते डिसेंबर २० दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकावर निर्बन्ध आल्याने मागील वर्षभरापासून सरपंच पदासाठी तयारी करणाऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. येत्या जुलै ते डिसेंबर २० अखेरपर्यंत शेवगाव तालुक्यतील ४८ च्यावर ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे . मात्र सध्यातरी या निवडणुका वेळेतच होतील अशी चिन्हे दिसत नाही. तसे संकेतही शासनाने दिले आहे. ग्रामपंचायतीला खर्च करण्याचे अतिरिक्त अधिकार दिल्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कधी नव्हे इतकी स्पर्धा आता बघायला मिळत आहे. पूर्वी निधी खर्चाचा अधिकार फारसा नव्हता. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक न होताच बिनविरोध सदस्य निवडून दिले जात होते. मात्र मागील काही वर्षामध्ये हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. शासनाच्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत आहे. जनतेतून सरपंच व सरपंचाना मिळालेले वाढीव अधिकार यामुळे गावपातळीवर स्पर्धा निर्माण झाली आहे. दरम्यान राज्य शासनाने जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे गाव पातळी वरील पुढारी हे कामाला लागले आहे.

 


गावागावात विकास कामांच्या चर्चा...!

 

कोरोनाची दहशत असतानाही मुदत संपुष्टात येत असलेल्या बहुतांश गावामध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. मात्र शासनाच्या आदेशामुळे अनेकांचे स्वप्न भंग झाले आहे. यावर्षी गावागावात मास्क , सॅनीटायझर शक्य तितकी मदत, जीवनावश्यक वस्तू वाटप करत आपली उमेदवारी निश्चित करण्याचा प्रयन्त केला आहे. एवढेच नाहीं तर घरोघरी संपर्कही वाढविला आहे.

 


शेवगाव तालुक्यातील ४८ ग्रा.पं.च्या निवडणुका लांबण्याची शक्यता.....?

 

शेवगाव तालुक्यातील अधोडी, अखतवाडे, अंतरवली बु.,अंतरवली खु.,आव्हाने खु.,बक्तरपुर, बेलगांव, भातकुडगाव, भावीनिमगाव, बोडखे, चापडगाव, चेडेचांदगाव, दादेगाव, दहीगाव शे, ढोरजळगाव ने, ढोरजळगाव शे, गडेवाडी, गा. जळगाव, घोटण, हसनापुर, हातगाव, जुने दहिफळ, कांबी, खुंटेफळ, कोळगाव, कोनोशी लखमापुरी, मजलेशहर, मळेगावं शे, नागलवाडी, नजिक बाभूळगाव, नवीन दहिफळ, निंबनांदुर, पिंगेवाडी, राक्षी, राणेगाव, शेकटे बु.,शिंगोरी, सोनेसांगवी, सोनविहिर, सुकळी, बु., सुलतानपूर बु., ताजनापुर, तळणी, ठा.निमगाव, ठा.पिंपळगाव, वाडगाव, वरखेड या ४८ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची मुदत येत्या जुलै ते डिसेंबर २० अखेरपर्यंत संपत आहे.