बेलापुर- नरसाळी रस्त्याचे काम पावसात .....अभियंता अनभिज्ञ

                      विभागीय अभियंता रोकडेंची मात्र कबुली : निधीची नासाडी


-----------------------------------------------------------------------------------------------------------------


बेलापुर (शफीक बागवान ) - पाऊस पडला.... कमी झाला का... जास्त होता ... किती
झाला....असा प्रश्नार्थक संवाद साधत बेलापुर नरसाळी रस्त्याचे भर पावसात सुरू असलेल्या
कामाबाबत सार्वजनीक बांधकाम श्रीरामपूरचे उप विभागीय अभियंताच अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट
झाले.
बेलापुर - नरसाळी या ५ किलोमीटर रस्त्याचे काम मोठ्या जोमाने चालू आहे. गेल्या अनेक
वर्षापासून हा रस्ता दुरूस्ती अभावी धुळखात पडला होता. नेत्यांच्या भगीरथ प्रयत्नातून यासाठी
अंदाजे अडीच कोट रुपये मिळाले. याबाबत ग्रामस्थांमध्ये कमालीचा आनंद होता. सध्या बिबीऐम
(डांबर व मोठी खडी मिक्स करून रस्त्यावर अंथरवीने) चे काम झाले असून त्यापुढे सिलकोट,
कारपेट, डांबर स्प्रे, किलोमीटर दगड बसवीने आणि शेवटी फर्लांग असे रस्त्याचे काम होणार आहे.
शनिवार (दि.१३) रोजी संध्याकाळी पावसाने सुरुवात केली. याबाबत राष्ट्र सह्याद्री च्या
प्रतिनिधीने दुसर्‍या रविवारी (दि.१४) रोजी याबाबत उपविभागीय अभियंता प्रकाश उजागरे
यांच्याशी संवाद साधला. पावसातही रस्त्याचे काम चालू असून त्याकडे लक्ष घाला, असे सांगताच "
पाऊस पडला.... कमी झाला का... जास्त ... किती झाला....असा प्रश्नार्थक संवाद त्यांनी साधला.
भर पावसातही रस्त्याचे काम झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
त्यानंतर लगेचच शाखा अभियंता रोकडे यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संवाद साधल्यानंतर
पाऊस किरकोळ आणि बुरबुर झाला तसेच तो काम झाल्यावर बरसला. पावसावेळी मी
त्याठिकाणी उपस्थित होतो, अशी कबुली त्यांनी दिली. तसेच बांधकाम खात्याचे इतरही काही
कर्मचारी देखरेखीसाठी हजर होते. दरम्यान एकाच खात्यातील अधिकारी - कर्मचार्‍यांमधील या
विसंवादामुळे खात्यातील बेबनाव यातून बाहेर पडला. याबरोबरच बेलापुर बाय पासचे कामही
भरपावसात आणि अंधारात चालू होते. यामुळे मोठ्या निधीची नासाडी होत आहे. ग्रामस्थांनी
याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.


Popular posts
कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून उत्तरे प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा
Image
पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत सोमवारी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते निवेदन देणार
मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ - सत्यजीत तांबे
Image
राज्यपाल नियुक्त विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला संधी द्यावी ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहेलवान
Image
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद कोरोना संदर्भातील नागरिकांच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे