<no title>शिवसेनेचे माजी उपसभापती उमेश पराडकरसह सात जणांना अटक

रत्नागिरी  | प्रतिनिधी


राजहपुर तालुक्यातील
रायपाटणचे सरपंच राजेश नलावडे व भाजपा कार्यकर्ते संतोष गांगण यांना मारहाण प्रकरणातील संयशीत आरोपी शिवसेनेचे माजी उपसभापती उमेश पराडकर यांसह सात जणांना सोमवारी दुपारी राजापूर पोलीसांनी अटक केली आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे. मंगळवारी सकाळी या सर्व संशयीतांना राजापूर न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.


राजापूरचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायपाटण दुरक्षेत्राचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र चव्हाण यांनी ही धडक कारवाई केली आहे.
वर्तमान पत्रात रायपाटण गावातील आलेल्या एका बातमीवरून दोन गटांमध्ये शनिवारी २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान रायपाटण येथे जोरदार हाणामारी झाली होती. या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या.
यातील रायपाटण सरपंच राजेश नलावडे यांनी केलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलीसांनी उमेश पराडकर, मंगेश पराडकर यांसह सात संशयीत आरोपी ंविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सोमवारी दुपारी या सातही संशयीत आरोपीेना पोलीसांनी अटक केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी जारी असतानाही त्याचा भंग करत एकत्र येत जमाव करून रायपाटण गावातील शिवसेनेचे रहिवाशी व माजी उपसभापती अविनाश पराडकर त्यांचे बंधू मंगेश पराडकर व अन्य पाच जणांनी आपणाला व आपले सहकारी संतोष गांगण यांना मारहाण केल्याची तक्रार रायपाटणचे सरपंच राजेश नलावडे केली होती. यातील जखमी राजेश नलावडे व संतोष गांगण यांच्यावर रत्नागिरीत उपचार सुरू आहेत.


या प्रकरणी शिवसेनेचे माजी उपसभापती उमेश केशव पराडकर, मंगेश केशव पराडकर, अमोल अशोक शेटये, जितू मोहन गांगण, महेंद्र रविंद गांगण, महेश महादेव ताम्हणकर व बाबा कांबळी सर्व रा. रायपाटण यांच्या विरोधात राजापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. या सातही जणांना सोमवारी दुपारी राजापूर पोलीसांनी अटक केली आहे. मंगळवारी सकाळी या सर्व संशयीतांना राजापूर न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे पोलीसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र चव्हाण अधिक तपास करत आहेत.


सत्यवान विचारे ,संगमेश्वर .