श्रीगोंदा तालुक्यात दक्ष नागरीक फाउंडेशनची कोरोनो संसर्ग विषाणू संदर्भात जनजागृती मोहीम हाती

श्रीगोंदा- दक्ष नागरीक फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप तसेच संचालक मंडळाने श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन कोरोनो विषाणू संसर्गजन्य आजारा संदर्भात जनजागृती करण्याची  मोहिम हाती घेतली आहे,तालुक्यातील प्रत्येक गावात वाड्या-वस्तीवर जाऊन कोरोनो आजार कसा पसरतो त्याला अटकाव कसा करायचा,काळजी कशी घ्यायची या संदर्भात तसेच जनतेसाठी जिल्हाधिकारी, तहसिलदार, बीडीओ, आरोग्य अधिकारी, पोलीस निरिक्षक व संपूर्ण पोलिस प्रशासन, महसुल प्रशासन,डाॅक्टर,आरोग्य सेवा आधिकारी,नगरपालिका,नगरसेवक,
सरपंच ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका,आशा,मदतनिस,काही स्वयंसेवी संस्था कशा प्रकारे जनतेसाठी राबत आहेत. या संदर्भात दक्ष नागरीक फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप हे दिवसभर फिरुन स्वखर्चाने दुचाकीवर स्पिकर बॉक्स ठेऊन माईक वरुन नागरिकांना सकाळ पासुन उशीरा पर्यंत फिरुन योग्य प्रकारे मार्गदर्शन करत आहेत.
श्रीगोंदा शहरातील सर्व, सोसायटी, छोटे छोटे भाग, वाडी, वस्ती, पारगाव सुद्रीक, बेलवंडी, बेलवंडी स्टेशन,महादेववाडी,लोणी व्यंकनाथ,मढेवडगाव,ढोकराई,श्रीगोंदा फॅक्टरी,लिंपनगाव,होलेवाडी या सर्व ठिकाणी जाऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले..ठिक ठिकाणी कोरोनो विषाणू संसर्गजन्य आजारा संदर्भात दिलेल्या माहीतीस तसेच जनतेसाठी राबणार्या प्रत्येक हातासाठी जनतेने घरात थांबून टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.