- गेल्या अनेक वर्षांपासून काष्टी ग्रामपंचायत कार्यालय दुसऱ्या मजल्यावर आहे आणि अनेक वर्षांपासून ते तळमजल्यावर असावे अशी मागणी ग्रामसभेत क्रांती प्रतिष्ठाण कडून होत होती , त्या अनुषंगाने अखेर ग्रामपंचायत कार्यालय तळमजल्यावर घेण्याचे ठरविण्यात आले,
त्याबद्दल सविस्तर माहिती अशी की काष्टी ग्रामपंचायत चे कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून दुसऱ्या मजल्यावर आहे , तसेच गावची लोकसंख्या जवळपास 25 हजार आहे त्यामध्ये 20% लोक हे वयोवृद्द आहेत आणि 2% अपंग आहेत, शासनाच्या अनेक योजनांची पूर्तता करण्यासाठी अनेक वेळा चढ उतार करावे लागते, या चढ उतारामुळे अनेक वयोवृद्ध तसेच दिव्यांग वर्ग कंटाळून जातात आणि ग्रामपंचायत कार्यालयात येण्याचे टाळतात त्याचा परिणाम ते शासनाच्या आलेले यौजनेपासून वंचीत राहिले आहेत आणि बोगस नावावर योजना दाखबून बिले काढल्याचे याआधी अनेक वेळा दिसून आले आहे , म्हणून वयोवृद्ध आणि अपंग यांच्यासाठी ग्रामसभेत ठराव मांडून सुद्धा तो ठराव ग्रामपंचायत ने याआधी मंजूर केला नाही .
सदर विषयाची तक्रार अपंग संघटनेने आपले सरकार पोर्टलवर नोंदवली त्याची दखल घेत दिनांक 27/12/2019 च्या मासिक सभेत ग्रामपंचायत सदस्यां सौ प्रतिभा रवींद्र दांगट यांनी ग्रामपंचायत कार्यालय तळमजल्यावर घेण्याचा ठराव मांडून त्याला मावळत्या सरपंच सौ सुलोचना वाघ यांनी अनुमोदन देऊन ठराव मंजूर केला . तळमजल्यावर असणारे 1 ) श्री शांतीलाल राजेंद्र मेहेर , 2 ) चिंतामणी योगेश नंदकुमार यांना प्रत्येकी 1 गाळा तर 3 ) खुलेश्वर पतसंस्थेला 2 गाळे असे भाडे तत्वावर दिलेले आहेत ते खाली करून घेण्याच्या नोटिसाही यांना पाठवण्यात आल्या आहेत,
परंतु त्या ठरावाला ग्रामपंचायत ने केराची टोपली दाखवली आहे.
म्हणून ग्रामपंचायत सदस्यांनी मांडलेले ठराव आणि सरपंचांनी अनुमोदन दिलेल्या ठरावाला ग्रामपंचायत केराची टोपली दाखवत असेल तर सर्वसामान्यांच्या ठरावाला ग्रामपंचायत किती किंमत देत असेल आणि ठराव मंजूर होऊन तीन महिने उलटले तरीही कोणतीही कार्यवाही ग्रामपंचायत ने अजुनपर्यंत का केली याची उलट सुलट चर्चा संपूर्ण गावात होत आहे असे क्रांती प्रतिष्ठाण चे अध्यक्ष श्री विक्रम संभाजीराव पाचपुते यांनी तक्रार अर्ज करून गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या निदर्शनास आणून दिले .
अपंग संघटनेची या मागणीवर जर ग्रामपंचायत कार्यालय दिशाभूल करत असेल तर राज्यमंत्री श्री बच्चू कडू यांना भेटणार असल्याचे सांगितले, त्यावर गटविकास अधिकारी श्री प्रशांत काळे यांनी तात्काळ कार्यवाही करावी असे आदेश ग्रामपंचायत ला दिले आहेत.
*काष्टी ग्रामपंचायत कार्यालय तळमजल्यावर घेण्याची गटविकास अधिकाऱ्याकडे क्रांती प्रीतिष्ठाण ची मागणी