कोरोना,गरीबांच्या मदतीसाठी जिल्ह्यात सर्वत्र राजकारणी मंडळी एकवटलेत, मात्र श्रीगोंद्यातील राजकारणी गायब झालेत ? राजेश डांगे


श्रीगोंदा प्रतिनिधी ः सध्या देशात सर्वत्र कोरोना ने हाहाकार माजवला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गरीबांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन,राजकीय नेते,सर्व यंत्रणा एकवटल्या पण श्रीगोंद्यातील आजी,माजी आमदार,कारखादार,जि.प.सदस्य,नगरसेवक कुढे गायब झाले आहेत ते जनतेची कधी मदत करणार असा सवाल राजेश डांगे यांनी केला आहे.
        पुढे बोलताना डांगे म्हणाले की आपण रोज टीव्ही,सोशल मिडीयावर पाहतो की जिल्ह्यात अनेक ठिकाणी आजी माजी आमदार,नगराध्यक्ष,नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य हे गरीबांच्या मदतीला घावुन येत असुन त्यांनी त्यांच्यासाठी,जेवन,अत्यावक्षक वस्तु देत आहेत,परंतू आमचे श्रीगोंद्याचे राजकारणी आता कोठे गायब झाले ते कळणे,निवडणुकींच्या काळात हेच राजकारणी स्वतःची पोळी भाजुन घेण्याकरीत सर्वसामान्यांचा वापर करुन घेतात आणि आता जनतेला त्यांची गरज असताना ते त्याच्या मदतीसाठी पुढे येइनात.आमचे काही नगरसेवक घरात बसुन हार्मोनियम,पेटी,वाजवत,गायन करीत असल्याचे स्वतः सोशल मिडीयावर पोस्ट टाकत आहे.
       कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सर्व यंत्रणा एकवटल्या असताना अनेक सामाजिक संघटना आणि उद्योग आस्थापनांनीही मदतीसाठी हात पुढे केला आहे.श्रीगोंदा तालुक्यात मात्र हे चीत्र उलट आहे व चीड आणनारे आहे.आज जनतेला गरज असताना वरील पैकी एखाद-दुसरा सोडला तर निवडणुकीच्या काळाज सर्वसामान्यांच्या जिवावर मोठे झालेल्यांना आज जनतेचा विसर पडला आहे.ही अतीशय दु:खदायक गोष्ट असल्याचे डांगे शेवटी म्हणाले.