श्रीगोंदा येथे जन्मदात्या बापाकडूनच आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार

                या आधीसुद्धा बापाकडून मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
सदर आरोपी नराधम बापाने काही महिन्यांपूर्वी देखील आपल्या या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मुलीच्या आईच्या जागृकतेमुळे पीडित मुलगी बचावली होती तेव्हा या बापाने गयावया केल्यामुळे पीडितेने व तिच्या आईने कुठलीही तक्रार नोंदवली नव्हती परंतु काल रात्री या नराधमाने पोटच्या मुलीलाच आपल्या वासनेची शिकार बनवली


श्रीगोंदा सिटीझन प्रतिनिधि - शहरात देखील आपल्या पोटच्या १५वर्षीय मुलीवर जन्मदात्या पित्यानेच अत्याचार केल्याची घटना दि२५एप्रिल शनिवारी रात्री पीडित मुलीच्या घरी घडली असून पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नराधम बापाविरोधात अत्याचार व पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तात्काळ मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला जेरबंद केले आहे
सदर घटनेबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की,काल दि२५ रोजी पीडित मुलीची आई व भाऊ हे शेजारी त्यांच्या नातेवाईकाचे मूल रडत असल्यामुळे त्यांच्याकडे गेले होते तर पीडित मुलीचा बाप हा मी घराच्या गच्चीवर झोपायला जातो असे सांगून घराच्या आतील खिडकीच्या मागे लपून बसला पीडित मुलीचे आई व भाऊ घराबाहेर गेल्यानंतर पीडित मुलगी घराचा दरवाजा बंद करून झोपली त्यानंतर खिडकीच्या मागे लपून बसलेल्या बापाने रात्री दोन वेळेस पोटच्या या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला सदर मुलगी झाल्या प्रकारामुळे घाबरली सकाळी आई घरी आल्यानंतर तिने झालेला प्रकार आईला सांगितला त्यानंतर आईने पीडित मुलीला घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये येऊन नराधम बापाविरोधात तक्रार दिली त्यानंतर पो नि जाधव यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घरत सदर आरोपी बापाला काही वेळातच जेरबंद केले सदर घटनेमुळे मात्र सगळीकडे खळबळ उडाली आहे