काष्टी परीसरात अवकाळी पावसाने कोटीचे नुकसान ( नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी )

  • काष्टी वार्ताहरः श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी परीसरात  विजांचा कडकडाट होवून वादळी वाऱ्यासह झालेल्या  जोरदार  अवकाळी पावसाच्या हजेरीने परिसरातील शेतकऱ्यांच्या गहू,हरबरा,कलिंगड,टरबूज, द्राक्षे या काढणीला आलेल्या उभ्या पिकांचे कोटीचे नुकसान     
    झाले असुन वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे,पडून घराचे पत्रे उडाल्याने अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने  शेतकरी आणखीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे या भागातील नुकसान झालेल्या 
    पिकांचे पंचनामे करुण घ्यावे तसा  आदेश आमदार बबनराव पाचपुते यांनी तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी  यांना द्यावा अशी मागणी आता शेतकरी वर्गातुन होत आहे. 
     दि.२५ रोजी भर उन्हाळ्यात पाडव्याच्या दिवशी सायंकाळी ४ ते ५ च्या सुमारास दिवसभर दमट वातावरण तयार होवून जोरदार वीजेच्या कडकडाट होवून वादळी वाऱ्या पाऊस होवून भागायत भागातील काष्टी,सागंवी,निमगावखलु,गार,कौठा,आर्वी,अनगरे, अजनुज, आनंदवाडी भागातील  शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या गहू,हरभरा, कलिंगड,टरबुज, द्राक्षे, पिकांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान होवून अनेक ठिकाणी झाडाची पडझड होवून घरांचे पत्रे  उडून वीज पुरवठा खंडीत झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
    सध्या कोरोना विषाणू चा प्रसार होवू नये त्याला प्रतिबंध घालण्यासाठी १५ एप्रिल पर्यत सर्वत्र बाजारपेठा बंद ठेवून लाॕकडावून केल्याने बाजारपेठेत किराणा व मेडिकल सोडलेतर सर्व दुकाने बंद आहे.परंतु काल झालेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांना शेतातील झालेला गहु,हरभरा झाकण्यासाठी बाजारपेठ बंद असल्याने कागद,ताडपत्री, धान्य भरण्यासाठी पोती,गोण्या मिळाल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर झालेले धान्य पावसात भिझले याला जबाबदार कोण अनेक ठिकाणी गहू हरभरा, काढणीला आलाय पण शासनाच्या  आदेशाने डिजेल बंद असल्यामुळे हार्वेस्टर चालकांना डिजेल नसल्यामुळे शेतातील गहू,हरबरा करता येईना याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे शेतकऱ्यांना लागणाऱ्या शेतातील सुविधा वेळेचे बंधन ठेवून शिथिल केल्या पाहिजे तसेच लाखो रुपये खर्चुन द्राक्षे,कलिंकड,टरबुज,यासह भाजीपाला पक्व होवून विक्रीला आलाय पण बाजारपेठ बंद असल्यामुळे तो शेतमाल विकता येईना त्यामुळे जीवापाड जपलेली फळ पिक शेतात सडून चालली आहे. याची दखल शासनाने घ्यावी आणि  झालेल्या अवकाळी पावसाने शेतातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुण शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल अन्यथा शेतकरी पूर्ण उध्वस्त होईल   यासाठी कृषी विभागाने पंचनामे करुण घ्यावे तसा आदेश आमदार बबनराव पाचपुते यांनी प्रशासनाला द्यावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्याने केली आहे