अहमदनगर, दि. २६ - जिल्ह्यातील २४३ व्यक्तींचे स्त्राव नमुने आतापर्यंत पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले असून त्यापैकी २२६ व्यक्तींचे स्त्राव नमुने निगेटीव आले आहेत. आज सकाळी १० वाजेपर्यंत काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठविलेल्या १९ पैकी १४ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटीव आहेत. काल रात्री तसेच आज सकाळी १० वाजेपर्यंत पाठविलेल्या एकूण अहवालापैकी आता ११ व्यक्तींचा स्त्राव नमुना अहवाल येणे बाकी असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.
दरम्यान, सध्या बाधित तीन रुग्णांसह एकूण ३० जण आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.
आतापर्यंत २४३ पैकी २२६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव पुण्याच्या एनआयव्ही संस्थेचा अहवाल
• SHAIKH AMIN HUSAIN