कर्जत : प्रतिनिधी
पुणे मुंबईहून येथे आलेल्या लोकांनी घरात थांबावे.बरेच लोक येथे पर्यटनाला आल्यासारखे वागत आहेत.या लोकांचा स्थानिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहे.जर या लोकांचा त्रास कमी झाला नाही तर प्रशासनाला कठोर कारवाई करावी लागेल असे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दैनिक श्रीगोंदा सिटीझनशी बोलताना सांगितले.
जनतेचे मोठ्या प्रमाणावर सहकारी लाभत आहे. रस्त्यावरील गर्दी नियंत्रणात आणण्यात यश येत आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेनेवरही पोलीस लक्ष ठेवून आहेत.जिल्ह्यांच्या सीमेवर खेड, सिद्धटेक येथे कर्मचारी तैनात केले आहेत. आरटीओचे लोकही मदतीला आलेले आहेत.त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यात नक्कीच यश मिळणार असल्याचे पोलीस निरीक्षक
सुनिल गायकवाड यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहेत.त्यात पोलीस यंत्रणा अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.सोशल मीडियातून कर्जत पोलिसांना जनतेचे चांगले सहकार्य व पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.
तर पुणे- मुंबईहून आलेल्यांवर कठोर कारवाई : सुनील गायकवाड