<no title>कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना जिल्ह्यातील सर्व भाजीपाला बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश फेरीद्वारे विक्रीस परवानगी


  • अहमदनगर, दि. 24 - अहमदनगर जिल्हयातील सर्व भाजीपाला बाजार दिनांक 31 मार्चपर्यंत भरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले असून भाजीपाला विक्री करणारे लोकांना फेरीव्दारे किंवा एखादया ठिकाणी बसून (फक्त एकाच भाजीपाला विक्रेत्यास गर्दी टाळून) परवानगी राहील. या आदेशाची आजपासूनच तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत.


                कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून भाजी बाजाराचे ठिकाणी नागरीकांची होणारी गर्दी टाळणेसाठी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.


                कोणतीही व्यक्ती/संस्था/सघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.     




Popular posts
कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून उत्तरे प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा
Image
पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत सोमवारी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते निवेदन देणार
मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ - सत्यजीत तांबे
Image
राज्यपाल नियुक्त विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला संधी द्यावी ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहेलवान
Image
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद कोरोना संदर्भातील नागरिकांच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे