नियम भंग करणाऱ्यांची कर्जत पोलिसांकडून धुलाई


कर्जत : प्रतिनिधी

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून बंद तसेच संचारबंदी आदेश दिलेले आहेत.मात्र कर्जत तालुक्यातील कित्येक लोकांकडून त्याचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.मात्र रस्त्यावरील गर्दी कमी होत नसल्याने कर्जत पोलिसांनी मंगळवारी सकाळी अनेकांची धुलाई करत खाकीचा दणका दाखवला.त्याचा परिणाम तालुक्यात दिसू लागला आहे.

पोलिसांच्या भूमिकेचे तालुक्यातून स्वागत करण्यात येत आहे.प्रशासनाकडून गर्दी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.कर्जत पोलीस,आरोग्य विभाग यांच्याकडून दोन आठवड्यापासून जागृती केली जात आहे.मात्र जनतेकडून त्याचे गांभीर्य न पाळता रस्त्यावर गर्दी करून अनावश्यक वाहनांचा वापर केला जात असल्याने पोलिसांनी कठोर पावले उचलली जात आहेत.कर्जत,राशीन,मिरजगाव, कुळधरण, सिद्धटेक,खेड आदी भागात पोलिसांची करडी नजर आहे.

जीव पोलीस धोक्यात घालून पोलीस जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहेत मात्र जनतेच्या प्रतिसादा अभावी त्याला मर्यादा येताना दिसत आहेत.शासकीय आदेशाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी केले आहे.

 

Popular posts
कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून उत्तरे प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा
Image
पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत सोमवारी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते निवेदन देणार
मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ - सत्यजीत तांबे
Image
राज्यपाल नियुक्त विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला संधी द्यावी ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहेलवान
Image
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद कोरोना संदर्भातील नागरिकांच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे