हात जोडतो घरात बसा; पोलिसी खाक्या माहितेय ना: गृहमंंत्री देशमुख

मुंबई: वारंवार सांगूनही लोक रस्त्यावर उतरत असतील तर पोलिसांना ‘पोलिसी खाक्या’ दाखवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिला. राज्यात लॉकडाउन केल्यानंतर लोकांनी ऐकलं नाही. परिणामी नाईलाजास्तव आम्हाला राज्यात संचारबंदी लागू करावी लागली, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.   


           देशभरात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना महाराष्ट्रातला आकडाही वाढतो आहे. राज्यात करोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकूण ४ चार झाली आहे. राज्यात या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असून लोकांनी सहकार्य करावे असं आवाहन देशमुख यांनी केलं. एका न्यूज चॅनलशो बोलताना देशमुख यांनी ही माहिती दिली.

राज्यात लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर शहरी भागातील अनेक नागरिक आपआपल्या गावाकडे रवाना झाले. घोळक्याने लोकं गावात आल्यानंतर त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. खूप मोठ्या प्रमाणावर शहरातून लोकं गावात आली आणि त्यांना काही संशय आला तर ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती द्यावी, असंही देशमुख म्हणाले.