देवळाली प्रवरा प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लाँकडाऊन घोषीत केल्याने बुधवारी सकाळी किराणा दुकान व भाजीपाला घेण्यासाठी नागरीकांची गर्दी उसळली. परंतू किराणा दुकानदार व भाजीपाला विक्रेत्यांनी अन्नधान्य व भाजीपाल्याचे भाव गगणाला भिडवले आहेत.दर वाढीचा फटाका सर्वसामान्य ग्राहकांना बसला आहे. प्रशासनाने अन्नधान्य व किराणामाल व भाजीपाला यांच्या किंमतीवर नियंञण आणावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. जीवनावश्यक वस्तू विक्रीत ग्राहकांची लुट करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे राहुरीचे तहसिलदार फसिओद्दीन शेख यांनी सांगीतले
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.शहरात एकही खासगी वाहन, दुचाकी व चारचाकी वाहनांना फिरण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी पायी बाहेर पडावे. विनाकारण कोणीही बाहेर पडू नये. अन्यथा, कारवाईला सामोरे जावे लागेल. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.असे राहुरीचे तहसिलदार फसिओद्दीन शेख यांनी केले.केंद्र सरकारकारच्या वतीने 14 एप्रिल पर्यंत लाँकडाऊन घोषीत केला असल्याने नागरिकांन मध्ये घबराटीचे वातावण निर्माण झाले आहे.त्यामुळे नागरिक किराणा, अन्नधान्य , भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करु लागले आहेत. भाजीपाला सध्या चढ्या दरात विक्री केला जात आहे.5 रुपयास मिळणारी कोथिंबीरची जुडी 15 ते 20 रुपयांना, मेथी 10 रुपयाची जोडी 25 रुपयांना, मिरची 40 किलोची 160 रुपये किलो, भोपळा 5 रुपये नग 20 ते 25 रुपये नग, टँमोटो 20 रुपये किलोचा 100 रुपये किलो , बटाटा 20 रुपये किलोचा 50 रुपये किलो , इतर भाजीपालांचे दरही गगणाला भिडले आहेत. बाजार समित्यांच्या अधिकृत दलालांकडे चौकशी केली असता भाजीपाल्यांच्या दरामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही. परंतू किरकोळ विक्रेत्यांनी माञ बंदचा फायदा घेवून मनमानी भावाने भाजीपाला विक्री करत आहे.शेतकऱ्यांकडे पुरेशा प्रमाणात भाजीपाला आहे.त्यामुळे नागरिकांनी किरोळ विक्रेते आथवा व्यापारी यांच्याकडे खरेदी करण्या ऐवजी शेतकऱ्यांकडे खरेदी केल्यास निश्चित कमी भावात भाजीपाला मिळणार आहे. असे बाजार समितीमधील भाजीपाला दलाल यांनी सांगितले आहे. भाजीपाला व्यापारी यांनी संधी फायदा न घेता बाजार भावाने भाजीपाला विक्री करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
अन्नधान्य व किराणा कडधान्ये यामध्येही किलोमागे 10 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. किराणा मालास मागणी वाढली आहे.लाँकडाऊन मध्ये 14 एप्रिल पर्यंत वाढ झाल्याने नागरिकांनी किराणा माल भरण्यासाठी गर्दी करु लागले आहेत. देवळाली प्रवरा नगरपालिकेने बुधवारी सकाळी किराणा व औषधांच्या दुकाना समोर तीन फुटाच्या अंतरावर ग्राहकांना खुना करुन दिल्या आहेत. ग्राहकांनी दुकाना समोर गर्दी करुन उभे राहु नये जेणे करुन साखळी तुटण्यास अडथळा येईल.भाजीपाला विक्री करण्यासाठी विक्रेत्यांनी शहरात व वाड्यावस्त्यावर फिरुण भाजीपाला विक्री करावी. भाजीपाला विक्री करताना विक्रेत्याने काळजी घ्यावी तसेच पाच पेक्षा जास्त नागरिक एकञ येणार नाही याची काळजी घ्यावी असे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तुंची विक्री करताना चढ्याभावाने विक्री करुन ग्राहकांची लुट केल्यास दुकानदारां विरोधात कायदेशिर कारवाई करण्यात येईल. दुकानदारांना घाऊक व्यापाऱ्याकडून माल आणण्यासाठी अत्यावश्यक सेवे अंतर्गत विशेष पास देवून वाहतुक व्यवस्थेला कोणतीही अडथळा येणार नाही .याची दक्षता घेतली जाईल त्यामुळे जीवनावश्यक वस्तूची विक्री करताना ग्राहकांची लुट करु नये असे असे राहुरीचे तहसिलदार फसिओद्दीन शेख यांनी सांगितले.
संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करु नका ; भांड
भाजीपाला व किराणा दुकानदारांनी नफेखोरी कमविण्यासाठी दरवाढ करु नये देशावर संकट ओढवले आहे. प्रत्येकाने मदतीचा हाथ पुढे केला पाहिजे. परंतू तसे न करता नफा कमविण्यामागे पळत आहेत. दुधाच्या खरेदी व विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. नागरिकांनी कोरोनाशी धैर्याने लढा दिला पाहिजे. प्रशासनाने जे नियम घालुन दिले आहेत. ते पाळले पाहिजेत.
अध्यक्ष चैतन्य उद्योग समुह