नवी दिल्ली - कोरोनाव्हायरस संकटापासून बचावासाठी अर्थमंत्री निर्मला निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. सरकार कोणालाही उपाशी झोपू देणार नाही असेही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली होती. यामुळे दैनंदिन जीवन आणि आर्थिक गोष्टी मंदावल्या होत्या.
अर्थमंत्र्यांच्या घोषणा
- लॉकडाऊनने प्रभावित गरीबांना मदत केली जाईल. ज्यांना त्वरित मदतीची गरज आहे त्यांना दिलासा दिला जाईल. पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली जाईल.
- पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी गरीब लोकांना 3 महिन्यांपर्यंत 10 किलो गहू किंवा तांदुळ आणि एक किलो डाळ देण्यात येईल. - हे गहू आणि तांदूळ रेशनव्यतिरिक्त असेल, तसेच हे मोफत देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा केले जाईल. यामुळे 8.69 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल.
- मनरेगा अंतर्गत वेतन 182 वरून 202 रुपये केले. 3 कोटी ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटीचा) लाभ मिळेल.