वाहनाचे योग्यताप्रमाण नुतनीकरण तपासणीचे कामकाज 23 मार्च, 2020 पासून बंद

  • पुणे दि. 24 : राज्यात कोरोना विषाणुचे संक्रमण वेगाने होत आहे, त्यास प्रतिबंध करण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार वाहनाचे योग्यताप्रमाण नुतनीकरण तपासणीचे कामकाज               दि. 23 मार्च 2020 पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे,  असे पिंपरी चिंचवडचे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, विनोद सगरे, यांनी पत्रकान्वये कळविले आहे.