कर्जत बसस्थानक,दादा पाटील महाविद्यालय परिसरात अश्लील चाळे करून टिंगलटवाळी करणाऱ्या दहा रोडरोमिओंची धुलाई करत कर्जत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली.सोमवारी सकाळपासूनच महाविद्यालयाच्या मार्गावर पोलीस लक्ष ठेवून होते.टारगट मुलांचा मुलींना त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी टवाळखोरांची रस्त्यावरच धुलाई करून पोलीस स्टेशनमध्ये आणून कारवाई केली.
पोलीस उपअधीक्षक संजय सातव,पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने, हेड कॉन्स्टेबल मनोज लातूरकर,अमित बरडे,बळीराम काकडे, देविदास पळसे,पोलीस हवालदार सलीम शेख, महादेव गाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कर्जत पोलिसांनी अचानकपणे केलेल्या धडाकेबाज कारवाईने टवाळखोरांना चांगलीच अद्दल घडली.पोलिसांनी पकडलेल्या दहा रोडरोमियोंना ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११०,११७ अन्वये कारवाई केली. लेखी समज देऊन तासाभराने सोडण्यात आल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
कर्जत शहरात महिला तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनींना त्रास होत असल्याच्या तक्रारी होत्या.दादा पाटील महाविद्यालयात सोमवारी सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने मुली नटूनथटून आलेल्या होत्या.त्यांच्यावर छाप टाकण्याच्या नादात ते पोलिस कारवाईचे बळी ठरले.