आज दिनांक 3 फेब्रुवारी 2020 रोजी सिंचन भवन येथे महाराष्ट्र रेखाचित्र शाखा संघटना अहमदनगर जिल्हा शाखेस केंद्रीय कार्यकारणी मधील माननीय अध्यक्ष श्री जकी जाफरी प्रमुख सल्लागार ,श्री आर डी करपे, औरंगाबाद, सरचिटणीस श्री सुधीर गभणे, व महिला प्रतिनिधी सौ वंदना परिहार नागपूर यांनी भेट दिली केंद्रीय कार्यकारिणीच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त सदर बैठकीचे आयोजन श्री गोरख लिपारे अध्यक्ष, श्री.गाडे श्री हाफिज शेख , श्री दीपक कुलकर्णी व श्री विनायक सवाई सर्वांनी मिळून करण्यात आले होते. बैठकीस नगर जिल्ह्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रथम श्री. किरण मुळे सहकोषाध्यक्ष केंद्रीय कार्यकारणी व सचिव अहमदनगर जिल्हा यांनी सर्वांची ओळख करून देऊन प्रास्ताविक केले.त्यानंतर केंद्रीय कार्यकारिणीचा सत्कार होऊन श्री. आर डी करपे, श्री सुधीर गभणे, सौं वंदना परीहर यांचे भाषण झाले त्यानंतर उपस्थित सभासदांपैकी श्री कनगरे, श्री सोयगावकर, सौ कांबळे, श्रीमती डोकबाने यांनी त्यांचे प्रश्न सभेपुढे मांडून चर्चा केली. श्री. हाफिज शेख यांनी त्यांच्या संकल्पनेतून संघटनेचा लोगो चे रेडियम स्टिकर स्वतः बनवून तयार केले त्याचेही अनावरण व लोकार्पण केंद्रीय कार्यकारणी च्या हस्ते संपन्न झाले सदर रेडियम चे स्टिकर्स सर्वांना वाटण्यात आले त्यानंतर शेवटी अध्यक्षीय भाषण होऊन माननीय अध्यक्ष श्री. जकी अहमद जाफरी यांनी विविध विषयावर आपले मनोगत व्यक्त केले संघटनेचे आतापर्यंत केलेले कार्य पुढील भविष्यात करावयाचे कामे याचा ऊहापोह केला यापुढेही सर्वांनी संघटनेला अशीच मदत करण्याची विनंती केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनायक सवाई यांनी केले कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व व नियोजन बद्ध रीतीने पार पडलं
महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा संघटना अहमदनगर जिल्हा शाखा समवेत केंद्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न
• SHAIKH AMIN HUSAIN