मराठा व धनगर समाजाच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची आ.रोहित पवारांची मागणी


कर्जत : प्रतिनिधी


मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्यातील अनेक तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यभरात वेगवेगळी आंदोलने केली.लोकसभेच्या तत्कालीन अध्यक्षा सुमित्रा महाजन या चौंडी येथे आल्या असताना धनगर समाज बांधवांनी त्यांना आरक्षणाबाबत निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता,परंतु त्यावेळी स्थानिक प्रशासनाने त्यांना सहकार्य केले नाही.उलट पोलिसांनी लाठीमार करुन त्यांच्यावर ३०७,१२० व ३५३ सारखे गंभीर गुन्हे दाखल केले.लोकशाही मार्गाने आंदोलने केलेल्या अनेक आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देवून केली आहे.

निवेदनात आ. पवार यांनी म्हटले आहे की, आधीच्या सरकारने केवळ सूड भावनेने हे गुन्हे दाखल केले असून त्यात शिक्षण पूर्ण झालेले आणि नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांचाही समावेश आहे. पण गुन्हे दाखल झाल्यामुळे या तरुणांचे भविष्य कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. याबाबत राज्यातील वेगवेगळ्या भागातील मराठा व धनगर समाजातील तरुणांनी सामाजिक आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.

नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असलेला चारित्र्याचा दाखला या युवकांना मिळत नसल्याने त्यांना नोकरी मिळणे कठीण बनले आहे.विविध सामाजिक संघटनांनी त्यांच्या मागण्या पुर्ण होण्याकरिता केलेल्या मोर्चात सहभागी असलेल्या विद्यार्थी तसेच इतर नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत तातडीने आदेश व्हावेत अशी मागणी निवेदनातून केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कायदेशीर बाबी तपासून मराठा व धनगर समाजातील तरुण आंदोलकांवरील हे गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आ. पवार यांना दिले.यावेळी रोहित पवार यांनी पीएसआय,आरटीओ आणि फॉरेन्सिक लॅब कर्मचारी यांच्यासंदर्भातील अनेक विषयांवरही चर्चा केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.

Popular posts
कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून उत्तरे प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा
Image
पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत सोमवारी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते निवेदन देणार
मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ - सत्यजीत तांबे
Image
राज्यपाल नियुक्त विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला संधी द्यावी ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहेलवान
Image
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद कोरोना संदर्भातील नागरिकांच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे