ग्राहकांची फसवूणक होणार नाही याची दक्षता घ्‍यावी- जिल्‍हाधिकारी श्री द्विवेदी

अहमदनगर दि.3- ग्राहकांचे अधिकार अबाधित ठेवून ग्राहकांची फसवणूक होणार नाही यासाठी सर्व संबधीतांनी काळजी घेण्‍याच्‍या  सुचना जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिल्‍या.


जिल्‍हाधिकारी कार्यालय,अहमदनगर येथे आयोजित जिल्‍हास्‍तरीय ग्राहक संरक्षण परिषदेची बैठकीत उपस्थित सदस्‍यांना  मार्गदर्शन करताना जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी बोलत होते. यावेळी जिल्‍हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी,  ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्‍य व अशासकीय सदस्‍य आदि उपस्थित होते.


            यावेळी लाईट बील वेळेवर न मिळणे, जिल्‍हयातील काही भागात विद्युत पोलवरील अनियमित दाब, वाकलेले विद्युत पोल, लोबकळलेल्‍या तारा, रिक्षामध्‍ये मिटर बंद असणे, ग्राहक सुविधा केंद्रात अनाधिकृत पावती देणे, रुग्‍णाकडून वैद्यकीय तपासणीसाठी जास्‍तीचे पैसे घेणे, बसेसे वेळेवर न येणे बसेस नादुरुस्‍त होणे आणि गॅस एजन्‍सीकडून घेण्‍यात येणा-या अतिरिक्‍त वाहतुक दर याबाबत ग्राहकांचे फसवणूक होत असल्‍याचे ग्राहक संरक्षण परिषद सदस्‍यांनी निर्दशानास आणून दिले त्‍यावर चर्चा करण्‍यात आली तसेच ग्राहकाने अदा केलेल्‍या मुल्‍यांचा पुरेपुर लाभ त्‍यांना मिळावा अशी सूचनाही जिल्‍हाधिकारी यांनी केली.


 बैठकीस जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, अन्‍न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्‍त, दूरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता, वैधमापन शास्‍त्रचे सहायक नियंत्रक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,अहमदनगर, एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक, सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अधीक्षक अभियंता तसेच अशासकीय सदस्‍य  विलास जगदाळे, अतुल कु-हाडे, कारभारी गरड, शाहूराव औटी, अशोक शेवाळे, डॉ. रजनीकांत पुंड, सुनिलकुमार रुणवाल व अशोक गायकवाड आदि उपस्थित होते.


Popular posts
कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून उत्तरे प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा
Image
पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत सोमवारी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते निवेदन देणार
मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ - सत्यजीत तांबे
Image
राज्यपाल नियुक्त विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला संधी द्यावी ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहेलवान
Image
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद कोरोना संदर्भातील नागरिकांच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे