ठाणे कळवा येथून हरवलेल्या मुलीला माणगांव पोलीसांनी केले तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन

बोरघर | माणगांव : ठाणे जिल्ह्यातील कळवा येथून हरवलेली कुमारी अश्विनी मंगेश घाडगे वय वर्ष अकरा ही मुलगी शनिवार दिनांक १८ जानेवारी रोजी रात्री ०३ वाजता रायगड जिल्ह्यातील माणगांव रेल्वे स्थानकावर माणगांव पोलीस ठाण्यातील बीट मार्शल पोलीस शिपाई नाथा दहिफळे हे रात्री गस्तीवर असताना त्यांना शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२० रोजी रात्री ०३ :०० वाजता कडाक्याच्या थंडीत कुडकुडत असताना सदर मुलगी घाबरलेल्या अवस्थेत आढळून आली. बीट मार्शल पोलीस नाथा दहिफळे यांनी सदर घाबरलेल्या मुलीला धीर देत तिला सुरक्षितपणे तात्काळ माणगांव पोलीस ठाण्यात आणले. सदर मुलगी अल्पवयीन असल्याने तिला बडीकॉप मधील मपोहवा दया पाटील यांनी रात्रभर सांभाळली. आणि त्या मुलीला धीर देऊन तिच्या कडून तिच्या आई वडिलांची आणि तिच्या राहण्याचे ठिकाणा बद्दल माहिती विचारून घेतली. सदर मुलीने सर्व माहिती दिल्या नंतर त्यांनी सदर मुलगी ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे समजताच त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात संपर्क करुन मुलीचे आईवडीलांना कळविण्यास सांगितले. त्यानुसार तेथिल बीट मार्शल यांनी हरवलेल्या मलीचे आईवडीलांना मुलगी आश्विनी ही रायगड जिल्ह्यातील माणगांव पोलीस स्टेशनला सुखरूप असल्याची माहिती दिली. त्यावरून तिच्या आईवडीलांना माणगांव पोलीस ठाण्यात बोलाऊन मुलीला तिचे वडील मंगेश रामा घाडगे वय ३६ वर्षे धंदा- मजुरी राहणार शिवगर्जना चाळ, खोली नं. ३६३, भास्कर नगर, कळवा जि. ठाणे यांची सखोल चौकशी करून त्यांची पूर्ण खात्री झाल्यावर सदर मुलीला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आली आहे. सदरची कारवाई आणि कौतुकास्पद कामगिरी माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष बीट मार्शल नाथा दहिफळे आणि बडीकॉप पोलीस कर्मचारी दया पाटील यांनी माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी शशिकिरण काशिद आणि माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरी मुळे सदर हरवलेल्या मुलीच्या आईवडिलांनी, नातेवाईकांनी आणि माणगांव तालुक्यातील सर्व नागरिकांनी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. त्यामुळे माणगांव पोलीसांचे माणगांव तालुक्यात आणि ठाणे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.