सहकारी मित्रांच्या मदतीला वर्गमित्र आले धावून (ज्वारी काढनिला मजूर मिळेनात म्हणून वर्गमित्र सरसावले)


 सध्या रब्बी हंगाम चालु असताना  गव्हाची पेरणी पूर्ण होवून आता ज्वारी काढणीला आली पण मजुर मिळेना म्हणून एका मित्राच्या मदतीला काॕलेजमधील वर्ग मित्र धावून आले आणि सहकारी मित्रांची ज्वारी काढून दिली 

श्रीगोंदा तालुक्यातील गाडे मळ्यातील युवा शेतकरी सागर रावसाहेब गाडे यांची ७ एकर ज्वारी काढण्यासाठी मजूर  मिळेनात म्हणून तालुका येथील महाराजा कॉलेज मधील      त्याचे वर्गमित्र त्यांची ज्वारी काढण्यासाठी सरसावले

मात्र शेतकऱ्यांना परवडेल अशा रोजंदारीवर शेतमजूर मिळत नसल्याची वस्तुस्थिती श्रीगोंदा तालुक्यात सर्वत्र निर्माण झाली आहे.त्यामुळे शेतमजुरांची वाणवा  आणी वाढलेल्या मजुरीचा दर यांचा सामना करण्याची वेळ अनेक शेतकरी कुटुंबावर आली आहे.या पार्श्वभूमीवर काही युवक वर्गमित्र शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ज्वारी काढणीस सुरवात केली आहे.सदर वर्गमित्र मढेवडगावचे गोरख उंडे, भोळेवस्तीचे अमोल भोळे , आढळगावचे गणेश बोत्रे, बेलवंडी कोठारचे महेश जाधव , अक्षय जाधव, चांडगावचे महेंद्र मस्के, राहुल जाधव, रावसाहेब गाडे, विठ्ठल डांगरे , विश्वनाथ धुमाळ, संजय लांडगे , रामभाऊ गाडे, सतीश जाधव यांचा समावेश होता.सध्या पुरुषाला पाचशे रुपये तर महिलेला तीनशे रुपये या प्रमाणे मजुरी ध्यावी लागते आहे.एकरभर ज्वारी काढण्यासाठी सात ते आठ हजार रूपये एवढी  मजुरी खर्च येतो.सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिरायती पट्टयातील शेतकऱ्यांना हा खर्च परवडनारा नाही.त्यावर उपाय म्हणून गाडे यांचे वर्गमित्र गोरख उंडे यांनी अशी शक्कल लढवली....याच एकजुटीच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चौकटः पूर्वी शेतात पिकविलेला माल गहू,ज्वारी,बाजरी,हरबरा, या सारखे काम करायला मनुष्य बळ कमी असल्यामुळे अनेक लोक एकत्र येवून एकमेकांची शेतीची कामे करायची त्यांला इर्जिक असे म्हणायचे तीच वेळ आता यांत्रिक युगात पुन्हा पहायला मिळते गोरख उंडे मढेवडगाव

Popular posts
कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून उत्तरे प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा
Image
पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत सोमवारी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते निवेदन देणार
मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ - सत्यजीत तांबे
Image
राज्यपाल नियुक्त विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला संधी द्यावी ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहेलवान
Image
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद कोरोना संदर्भातील नागरिकांच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे