श्रीवर्धन आगारात सुरक्षितता मोहिमेचे आयोजन

श्रीवर्धन आगारात बोरघर | माणगांव : श्रीवर्धन आगारात सुरक्षितता पंधरवडा ११जानेवारी २०२० ते २५ जानेवारी २०२० पर्यत सुरक्षितता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोकळे सर ,व मयेकर सर, औ प्रा संस्था नादवी चे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते पोकळे सर यांनी आपले मनोगतात सांगितलेकी, वाहन चालविताना नियमांचे पालन केल्यास अपघाताची संख्या झपाट्याने कमी होईल. दारु पिऊन वाहन चालविल्यास अपघात होतात. हे माहित असूनही अनेकजण दारु पिऊन वाहन चालवितात. रात्रीच्या वेळी डिफरचा वापर करवाओव्हरटेक करणे टाळा अशा सर्व नियमांचे पालन केल्यास अपघात टाळण्यास मदत होईल, असे मत पोकळे सर यांनी व्यक्त केले. तर आगार व्यवस्थापक मा जुनेदी म ब यांनी आपले मनोगतात सांगितले की योग्य दिशेने आणि योग्य वेगमर्यादेने वाहन चालविणे ही वाहचालकांची सर्वप्रथम जबाबदारी आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी वाहनांचा वेग किती असावा असे लिहिलेले असते त्याचे पालन करा. अधिक वेगाने वाहन चालवू नका. डाव्या बाजूला अथवा उजव्या बाजूला वळण्याआधी इंडीकेटर अवश्य चाल करा त्यामळे मागे असणारे वाहन सावध होईल. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न न कराल तर उत्तम आणि जर करायचेच असेल तर दिवसा हॉर्नचा आणि रात्रीच्यावेळी डिप्परचा उपयोग करा. तुमच्यापुढे असलेले वाहन तुम्हाला पुढे जाण्यासाठी रस्ता देईपर्यंत वाट पहा. रात्रीच्यावेळी वाहनाचे हेडलाईट चालू ठेवा. रस्त्यावर ठिकठिकाणी सुरक्षाविषयक चिन्हे लावलेली सचिव, प्रदीप विचारे सहायक कार्यशाळा अधिक्षक, श्रीमती लांजेकर, वाहतूक निरीक्षक सोनाली सोमण, आगार लेखकार सागर वाढवळ, वरिष्ठ लिपिक अनिल खडके, अनिल जाधव, मंगेश चांदोरकर, श्रीकांत ठोसर, गोविंद खटके, प्रसाद मोरे, राजेश थोरे, नितिन पुसाळकर शंकर इंगोलआणि मोठ्या संख्येने रा प कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमास औधोगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रकाश बिरार सर यांनी सहकार्य केले. मा आगार व्यवस्थापक यांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करणेत आली.