श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकुलातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत डॉ.अन्वर शेख यांचे GPAT स्पर्धा परीक्षा तयारी यावर मार्गदर्शन व्याख्यान नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
स्वतःवरती विश्वास ठेऊन सातत्याने अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेत नक्कीच यश संपादन कराल असा गुरुमंत्र डॉ.शेख यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला.
औषधनिर्माण शास्त्रातील पदव्युत्तर(एम.फार्म.)प्रवेशासाठी GPAT ही परीक्षा अनिवार्य आहे. अभ्यासातील बारकावे आणि मुद्दे यावर डॉ. अन्वर शेख यांनी प्रकाशझोत टाकत GPAT या परीक्षेची तयारी कशी करायची याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली. तसेच काही महत्वाच्या सूचना देवून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
या उपक्रमाचे अध्यक्षा डॉ.प्रतिभाताई पाचपुते, सचिव विक्रमसिंह पाचपुते, विश्वस्त प्रतापसिंह पाचपुते, डॉ. विजय पाटील, डॉ. तान्हाजी दबडे, प्रा. अमोल खेडकर, प्रा. शाम नायसे, डॉ. सुदर्शन गिरमकर, प्रा.जेम्स मेनन, प्रा.मोहन धगाटे यांनी कौतुक केले. शेवटी अमोल खेडकर यांनी आभार मानले