स्व शिवाजीराव(बापू) नागवडेंच्या कार्याचा राज्यात ठसा -प.पू. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

स्व शिवाजीराव बापू नागवडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नावलौकिक असून त्यांचे कार्य अजरामर आहे असे मत अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ गुरुपीठ,श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी दरबार प्रमुख प पू गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केले लोकनेते सहकारमहर्षी स्व शिवाजीराव नागवडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आज ते श्रीगोंदा फॅक्टरी येथील आयोजित सत्संग व शेतकरी मेळाव्यात बोलत होते


स्व बापूंच्या पुतळ्याचे अनावरण आज गुरुमाऊली यांच्या हस्ते व नागवडे कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे,महिला बालकल्याण माजी सभापती अनुराधा नागवडे,दिपकशेठ नागवडे,माजी आमदार राहुल जगताप यांच्या उपस्थितीत झाले

यावेळी बोलताना गुरुमाऊली मोरे म्हणाले की,अन्न पिकवणारा शेतकरी हा खरा ब्राम्हण आहे,मुलांवर अध्यात्मिक संस्कार झाले तर देश पुंडलीकमय होईल,संस्कार केले तरच संस्कृती टिकेल,तसेच आजचे तरुण निर्व्यसनी शाकाहारी बनवणे गरजेचे आहे,स्वामी समर्थ केंद्रे ही माणूस दुरुस्त करण्याची ग्यारेज असल्याचे मोरे यांनी यावेळी सांगितले तसेच देशात शेतकऱ्यांच्या मुलांना सध्या नोकरी नाही त्यामुळे त्यांनी शेतीनिगडीत जोडधंदा करावा तसेच यावेळी गुरुमाऊली मोरे यांनी उपस्थितांना अनेक आजारांवरील घरगुती आयुर्वेदिक सहज सोपे उपाय देखील सांगितले

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अनुराधा नागवडे म्हणाल्या की,नागवडे कुटुंबीय नागवडे कारखाना जपण्यासाठी कायम कटिबद्ध आहेत त्यामुळे कारखान्याची कुणीही चिंता करू नये,असे सांगूंन नागवडे कारखाना निवडणुकीवरून रान पेटवणार्या विरोधकांना त्यांनी चांगलेच खडे बोल सुनावले तसेच नागवडे कुटुंबीय जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत श्रीगोंदा तालुका सुरक्षित आहे असे सांगून गुरुमाऊली नागवडे कुटुंबियांमागे ठामपणे उभे आहेत त्यामुळे कोणतीही अडचण नाही तसेच एका महापुरुषाच्या कार्यक्रमासाठी दुसरे महापुरुष आल्याचे गौरवोदगार सौ नागवडे यांनी काढले

राजेंद्र नागवडे म्हणाले की,नागवडे कारखान्याचा संपूर्ण राज्यात नावलौकिक आहे,बापूंचा विचार व आदर्श सोबत घेऊन कारखाना राज्यात एक नंबर बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे तसेच जनतेची भावना लक्षात घेऊन कारखाना परिसरात दोन एकरावर बापूंचा पूर्णाकृती पुतळा व इमारत बांधणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले

कार्यक्रमासाठी जि प सदस्य सदाआण्णा पाचपुते,बाबासाहेब भोस,घनश्याम शेलार,माजी आमदार राहुल जगताप,कारखान्याचे सर्व संचालक,शिक्षक,प्राध्यापक यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व सेवेकरी उपस्थित होते